पाणी पुरी आणि सुकी पुरी
बंगलोरमध्ये राहत असताना सी एम एच रोडवर एम के अहेमदच्या जवळ एक पाणी पुरीवाला बसायचा त्याची पुरी सगळ्यात भारी होती. नेहमी मला त्याच्या सारखी पाणी पुरी बनवायची इच्छा होती. मागच्या आठवड्यात मी करून बघितली आणि एकदम तशीच झालेली. तो शेवटी एक सुकी पुरी पण खायला द्यायचा त्याची पण कृती इथे देत आहे
पाणी पुरी
साहित्य
२५ पुऱ्या
३ बटाटे
२.५ चमचा चाट मसाला
२.५ चमचा आमचूर पूड
१/२ चमचा + चिमुटभर जिरे पूड
१/२ चमचा + चिमुटभर धने पूड
चिमुटभर हिंग
१ चमचा कोथिंबीर
२ चमचा पुदिना
२ हिरव्या मिरच्या
१ लिंबू
६ वाटी पाणी
मीठ
कृती
- बटाटे उकडून घेणे.
- कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, २ चमचे चाट मसाला, २ चमचे आमचूर पूड, १/२ चमचा जिरे पूड, १/२ चमचा धने पूड आणि हिंग पाण्याबरोबर वाटून घेणे.
- मिश्रण गाळून त्यात लिंबाचा रस आणि मीठ घालणे.
- बटाटे कुस्करून घेणे व त्यात उरलेली जिरे पूड, धने पूड, चाट मसाला आणि आमचूर पूड घालुन मळणे.
- ३-४ पुऱ्या कुस्करून आणि ४ चमचे पुदिना पाणी मिश्रणात घालणे व एकत्र मळणे.
- थोडे थोडे मिश्रण पुरीत घालुन त्यात बनवलेले पाणी घालुन खायला देणे.
टीप
ह्यात थोडीशी चिंचेची चटणी घालुन थोडी गोडसर चव पण आणता येईल
सुकी पुरी
साहित्य
६ पुरी
२ टोमाटो
१/२ चमचा तिखट
१/२ लिंबू
चिमुटभर जिरे पूड
चिमुटभर धने पूड
चिमुटभर आमचूर पूड
मीठ
कृती
- बटाटे उकडून कुस्करून घेणे
- त्यात तिखट, जिरे पूड, धने पूड, आमचूर पूड आणि मीठ घालुन एकत्र करणे.
- पुरीमध्ये हे मिश्रण घालुन त्यावर २ थेंब लिंबाचा रस पिळणे व खायला देणे
टीप
फक्त सुकी पुरी खायची असेल तर थोडा चाट मसाला पण घालता येईल पण आम्ही नेहमी पाणी पुरी नंतर खात असल्यानी थोड्या वेगळ्या चवीसाठी मी चाट मसाला वापरत नाही
0 comments:
Post a Comment