पालक पुरी
अजॉयला पालक बिलकुल आवडत नाही. त्यामुळे त्याला पालक खायला घालायच्या हिशोबानी मी ह्या पुऱ्या बनवल्या
साहित्य
१ पालक
२ हिरव्या मिरच्या
१/२ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा जिरे
५ चमचा गव्हाचे पीठ
१ चमचा बेसन
मीठ
तेल
कृती
- पालकाची पाने, हिरव्या मिरच्या आणि जिरे एकत्र पाणी घालुन बारीक वाटणे.
- गव्हाचे पीठ, बेसन आणि मीठ एकत्र करणे व त्यात एक चमचा गरम तेल घालणे.
- त्यात पालकाचे वाटण पिठात घालुन पीठ साधारण एक तास भिजवणे.
- बारीक पुऱ्या लाटून तेलात तळणे.
टीप
पुऱ्या इतक्या चविष्ठ आहेत की त्याबरोबर भाजी वगैरेपण लागत नाही. एकदम सुंदर नाश्त्याचा प्रकार.
0 comments:
Post a Comment