Aug 2007
14
गोबी मन्चुरिअन
हि एकदम छान चायनीज पाककृती. आज मी बनवली आणि मस्त झालेली. घरी असलेल्या भाज्या वापरून केलेला हा पदार्थ एकदम चविष्ठ झालेला.
साहित्य
१ मध्यम आकाराचा फ्लॉवर
५ चमचे कॉर्न फ्लॉवर
४ चमचे मैदा
२ चमचे तिखट
३ चमचे आलं लसूण पेस्ट
३ चमचे टोमेटो केचप
१ श्रावणी घेवडा
२ बारीक चिरलेल्या मिरच्या
२ चमचे हॉट आणि स्वीट टोमेटो केचप
मीठ चवीपुरते
तेल
कृती
- फ्लॉवर कापून त्याचे खाण्याइतक्या आकाराचे तुकडे करणे.
- ४ चमचे कॉर्न फ्लॉवर, मैदा, तिखट, २ चमचे आलं लसूण पेस्ट आणि मीठ पाणी घालुन जाडसर भिजवणे.
- तेल कढईत घालुन गरम करणे.
- फ्लॉवरचे तुकडे भिजवलेल्या पिठात घोळवून मध्यम आचेवर तेलात गुलाबी रंगावर भाजून घेणे.
- उरलेले तेल एकदम छोट्या आचेवर ठेवून त्यात आलं लसूण पेस्ट घालणे.
- त्यात कापलेला कांदा, मिरच्या घालुन भाजणे.
- कांदा गुलाबी होऊ लागल्यावर दोन्ही सॉस घालुन ढवळणे.
- उरलेले कॉर्न फ्लॉवर अर्धा वाटी पाण्यात घालुन ढवळून मचुरिअन मध्ये घालणे.
- वरून श्रावणी घेवडा आणि हिरव्या मिरच्या घालणे.
टीप
ह्यात थोडा सोया सॉस घालता येईल पण माझ्याकडे तो नसल्यानी मी नाही घातला.
जर ग्रेव्ही सारखे बनवायचे असेल तर अजून थोडे कॉर्न फ्लॉवर पाण्यात घालुन ते सॉस घालताना घालावे.
0 comments:
Post a Comment