खजुराचा केक
जेंव्हा पासून मायक्रोवेव्ह घरी आणलाय तेंव्हा पासून मी केक बेक करण्याचा प्रयत्न करतीये. बऱ्याच वेळा केकच्याऎवजी कडक कुकीज झाल्या आणि बिचार्या अजॉयला खावे लागले. आज आई बाबा इथे येणार असल्यानी त्यांच्यावर प्रयोग करण्याचे ठरवले. :) ह्यावेळी केक एकदम चांगला झाला
साहित्य
१ वाटी मैदा
३/४ वाटी दुध
१/२ वाटी साखर
१/२ वाटी तेल
२० खजूर बिया काढून
१ चमचा बेकिंग पूड
सुकामेवा
कृती
- दुध, खजूर आणि साखर मिक्सरमध्ये वाटून पेस्ट बनवणे.
- ह्या पेस्टमध्ये तेल घालुन ढवळणे.
- मैदा आणि बेकिंद पूड २-३ वेळा चाळून घेणे.
- आधी बनवलेल्या पेस्टमध्ये मैद्याचे मिश्रण एकावेळी अंदाजे डावभर घालुन एकत्र करणे.
- केकच्या भांड्याला खाली तेल लावून त्यावर बटर पेपर घालणे.
- केकचे मिश्रण भांड्यात ओतून त्यावर सुकामेवा घालणे
- मायक्रोवेव्ह २००C वर गरम करणे
- केक खालच्या बाजूला ठेवून कन्व्हेक्शन मोड मध्ये २००C, १८०W वर २० मिनिट भाजणे
टीप
मैदा व बेकिंद पूड एकत्र करून चालणे फार महत्वाचे आहे अथवा केक खूप टणक होईल
खजूर व दुध एकत्र करून रात्रभर ठेवल्यास ते वाटण्यास सोपे जाते
माझ्याकडे Samsung 108STF हा मायक्रोवेव्ह आहे. केक भाजण्याचे तापमान, वेळ सगळे मायक्रोवेव्हवर अवलंबून असते त्यामुळे निराश न होता थोडे प्रयोग करावेत.
0 comments:
Post a Comment