पुलाव
मी जेंव्हा बंगलारूमध्ये होते तेंव्हा मी माझे प्रयोग रेडी मेड मसाल्यापासून सुरु केलेले. आता मी साधारणतः स्वतःचेह मसाले वापरते पण ही एक अशी पाककृती आहे ज्यात मला अजूनही MTRचा पुलाव मसाला वापरायला आवडतो. अर्थातच त्यांनी दिलेल्या कृती ऎवजी मी स्वताची एक कृती बनवली आहे. ती इथे देत आहे.
साहित्य
६ वाटी भात
१ कांदा
२ चमचे MTR पुलाव मसाला
१ चमचा आले लसूण पेस्ट
१/४ वाटी उकडलेले मटार
४-५ चमचे शेंगदाणे
४-५ काजू
४ चमचे तूप
मीठ चवीपुरते
कृती
- ३ चमचे तूप कढईत गरम करणे.
- त्यात बारीक चिरलेला कांदा आणि शेंगदाणे घालुन भाजणे.
- शेंगदाणे अर्धवट शिजल्यावर त्यात काजू आणि आले लसूण पेस्ट घालणे.
- काजू गुलाबी झाल्यावर त्यात पुलाव मसाला घालुन १ मिनिट शिजवणे.
- भात आणि मटार घालुन चांगले ढवळणे.
- उरलेले एक चमच तूप सोडून झाकण लावून २ मिनिट वाफ काढणे.
- मीठ घालुन पुलाव ढवळणे व अजून २-३ मीन शिजवणे.
टीप
काजू शेंग्दाण्यानंतर घालणे म्हणजे ते करपणार नाहीत
बासमती तांदुळाचा भात वापरला तर सुंदर वास येतो व पुलाव अजूनही चविष्ठ लागतो.
0 comments:
Post a Comment