मसाला डाळ
हि डाळ मी पुण्यात असताना असाच प्रयोग करताना बनवलेली. छान झाली आणि आई बाबांना एकदम आवडल्यामुळे इथे कृती देत आहे.
साहित्य
३ वाटी तूर डाळ
१ कांदा
१ टोमाटो
६-७ लसूण पाकळ्या
१/४ चमचा म्हवरी
१/४ चमचा जिरे
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचा गरम मसाला
कोथिंबीर
लोणी
मीठ
तूप
कृती
- १ वाटी पाणी घालुन डाळ कुकरमध्ये उकडून घेणे.
- तेल गरम करून त्यात म्हवरी आणि जिरे घालुन फोडणी करणे.
- त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या घालुन भाजणे.
- त्यात हळद, तिखट, जिरे पूड, धने पूड आणि गरम मसाला घालुन ढवळणे.
- त्यात टोमाटो घालुन पूर्ण शिजवणे.
- त्यात शिजवलेली तूर डाळ, मीठ घालुन चांगले ढवळणे व दोन-तीन मिनिट शिजवणे
- त्यात बरोबर पातळ होईल इतके पाणी घालुन उकळवणे.
- वरून कोथिंबीर घालणे व वाटीत वाढल्यावर लोणी घालणे.
टीप
डाळ शिजवताना मी जास्त पाणी घालत नाही त्यामुळे नंतर मसाल्यासकट शिजवताना त्याची चव डाळीत जाते.
0 comments:
Post a Comment