टोफू बर्गर
मला घरी बर्गर बनवण्याची फार इच्छा झालेली पण चिकन किंवा मटन नव्हत वापरायच. पनीर वापरण्याचे ठरवलेलं पण इंडिअन मार्केट थोड दूर असल्यानी शेवटी टोफू वापरायचा ठरवला. बर्गर चांगला झालेला, मसाले वापरल्यानी टोफूला चांगली चव आली.
साहित्य
४ बर्गरचे पाव
१०० ग्राम टोफू
२ कांदे
१ टोमाटो
१ लाल मिरची
४ चीज स्लाईस
१/२ वाटी लेट्युस
रांच ड्रेसिंग
मीठ
मिरे पूड
तेल
कृती
- टोफूचे तुकडे करून कढईत तेल घालुन गरम करून गुलाबी रंगावर भाजणे
- त्यात कांद्याचे तुकडे, लाल मिरची घालुन गुलाबी होईपर्यंत भाजणे.
- मीठ आणि मिरे पूड घालुन चांगले हलवणे. मिश्रणाचे ४ भाग करणे.
- प्रत्येक पावावर चीजचा स्लाईस ठेवून मिश्रणाचा एक भाग ठेवणे.
- त्यावर लेट्युस, टोमाटो, केचप आणि रांच सॉस घालुन दुसरा पाव ठेवणे व खायला देणे.
टीप
मी एकदम हलक्या आचेवर टोफू भाजला त्यामुळे तो एकदम छान मऊ राहिला. मसाल्यामुळे टोफूला चांगली चव आली.
0 comments:
Post a Comment