कांदा भजी
मी ह्या प्रकारची भजी खूप कमी वेळा बनवते कारण मला खेकडा पद्धतीची भजी फार आवडते पण मागच्या आठवड्यात ह्या प्रकारची भजी खावीशी वाटली म्हणून बनवलेली.
साहित्य
२ कांदे
१/२ वाटी बेसन
१/४ वाटी कोथिंबीर
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचा जिरे पूड
मीठ
तेल
कृती
- कांदा बारीक चिरून त्यात मीठ घालणे व ५-१० मिनिट बाजूला ठेवणे.
- त्यात बेसन, कोथिंबीर पाने, तिखट, हळद, धने पूड, जिरे पूड घालुन चांगले एकत्र करणे व पेस्ट बनवणे. लागल्यास थोडेसे पाणी घालणे.
- कढईत तेल गरम करून त्यातले एक चमचाभर तेल पिठात घालणे व ढवळणे.
- छोट्या छोट्या आकाराचे भजी तेलात टाकून गुलाबी रंगावर तळणे.
टीप
मी नेहमी कांद्याला मीठ लावून बाजूला ठेवते त्यामुळे त्याला सुटलेले पाणी भजीचे पीठ भिजवायला वापरता येते व पीठ नंतर पातळ होत नाही.
मी पिठात गरम तेल घातल्यानी सोडा वापरावा लागला नाही व तरीसुद्धा चांगली खुसखुशीत झालेली
0 comments:
Post a Comment