कोळंबीचे पॅटिस
भारतात असताना मी एक दोनदा पॅटिस बनवण्याचा प्रयत्न केलेला. पण त्याला कधीच चांगले पापुद्रे आले नाहीत. बरेच किचकट आणि पसारा करणारे काम होते. त्यामुळे इथे मी बाजारातल्या पफ पेस्ट्री शिटचा वापर करण्याचे ठरवले. एकदम छान झालेले पण अजूनही मनातली शिटपण स्वतः बनवण्याची इच्छा गेली नाहीये.
साहित्य
2 पफ पेस्ट्री शिट
१ वाटी कोळंबी
१ टोमाटो
२ कांदा
४ लसूण पाकळ्या
१ चमचा धने पूड
१ चमचा तिखट
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा जिरे पूड
१/२ चमचा मिरे पूड
चिमुटभर हळद
१ अंडे
मीठ
तेल
कृती
- पफ पेस्ट्री शिट फ्रीजमधून काढून त्यांना नेहमीच्या तापमानावर आणावे.
- त्या वेळात कढईत तेल गरम करून त्यात कांदा भाजून घेणे
- त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालणे आणि पूर्ण पणे शिजवणे.
- त्यात कोळंबी आणि लसूण घालुन अजून २-३ मिनिट शिजवणे.
- त्यात हळद, तिखट, गरम मसाला, जिरे पूड, मिरे पूड आणि मीठ घालणे व तेल बाजूला निघेपर्यंत भाजणे.
- त्यात धने पूड घालुन अजून एक-दोन मिनिट शिजवणे व बाजूला ठेवणे.
- ओव्हन २००C/४००F वर गरम करणे.
- बेकिंग ट्रेला तुपाचा किंवा लोण्याचा हात लावणे.
- प्रत्येत पेस्ट्री शिटला ३ उभ्या भागांत आणि २ आडव्या भागात कापून त्याचे १२ तुकडे करणे. प्रत्येक तुकड्यावर कोळंबीचे मिश्रण घालुन दुमडून बेकिंग ट्रेवर ठेवणे.
- अंडे फेटून घेणे व एक टिशू त्यात बुडवून पफ वर फिरवणे.
- ओव्हन मध्ये २००C/४००F वर १५ मिनिट भाजणे व गरम गरम खायला देणे.
टीप
मी मध्यम आकाराचे कोळंबी वापरलेली त्यामुळे मला त्याचे तुकडे करावे लागले नाहीत
अंड्याचा वापर केल्यानी वरून एकदम छान गुलाबी होतात.
0 comments:
Post a Comment