अंड्याचे तुकडे
काल मी उकडलेल्या अंड्यांचा थोडा वेगळा प्रयोग करून पहिला. नेहमीच्या अंड्याच्या भाजीपेक्षा थोडा वेगळा छान वाटला खायला.
साहित्य
४ अंडी
१ कांदा
२ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा तिखट
१/४ चमचा धने पूड
चिमुट भर मिरे पूड
चिमुटभर दालचिनी पूड
कोथिंबीर
मीठ
तेल
कृती
- अंडी उलालावून त्याचे कवच काढणे. अंड्याचे तुकडे करणे व बाजूला ठेवणे
- तव्यावर तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे तळणे.
- त्यात कांदा घालुन गुलाबी रंगावर परतून घेणे.
- त्यात मिरे पूड, धने पूड, दालचिनी पूड, अंड्यांचे तुकडे आणि मीठ घालुन ३-४ मिनिट परतणे.
- वरून कोथिंबीर आणि तिखट घालुन खायला देणे.
टीप
मला ह्यात जास्त मसाले न वापरता थोडी वेगळी चव द्यायची होती त्यामुळे मी दालचिनी वापरली आणि एकदम अचूक निवड होती
0 comments:
Post a Comment