वांग्याची भजी
भजी हा प्रकार महाराष्ट्रात फार प्रसिद्ध. लग्न असू वा घरी बोलवलेले पाहुणे, भजी पाहिजेच. आमच्याकडे भजी करून फार दिवस झाले असा लक्षात येत मी सोमवारी भजी बनवण्याचे ठरवले. पण मग वांगे बघून थोडा नवीन प्रयोंग करूया अस ठरवलं. प्रयोग एकदम यशस्वी त्यामुळे इथे पाककृती देतीये.
साहित्य
२ वाटी चिरलेले वांगे
१ कांदा
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचा जिरे पूड
१/२ वाटी बेसन
मुठभर कोथिंबीर
मीठ चवीपुरते
तेल
कृती
- चिरलेले वांगे, कांदा, तिखट, हळद, धने पूड, जिरे पूड, मीठ, बेसन आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करणे. थोडे पाणी वापरून भजीचे पीठ बनवणे.
- तेल गरम करणे. त्यातील २ चमचे तेल भजीच्या पिठात घालुन चांगले मिसळणे.
- छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून तळहातावर दाबणे.
- तेलात भजी दोन्ही बाजूनी होईल अशी भाजून गरम गरम खायला देणे.
टीप
मी नेहमी भजीच्या पीठाचे सगळे साहित्य एकत्र करून पाणी घालायच्या आधी ५ मिनिटे वाट बघते. त्यामुळे भाज्यांचे पाणी तेवाध्यावेलात सुटते व नंतर पीठ पातळ होण्याचा प्रश्न येत नाही.
0 comments:
Post a Comment