Jun 2011
02
पायेश
मी आधी पण हि डीश बनवली होती पण आज मिलिंद आणि अजॉयसाठी पुन्हा बनवल्यावर फोटो काढून रेसिपी लिहायचे ठरवले. अजॉयचा आवडता गोड पदार्थ आणि इतके सोप्पे
साहित्य
१ लिटर दुध
३/४ वाटी तांदूळ
१.२५ वाटी गुळ
कृती
- दुध उकळवून ३/४ होईपर्यंत आटवणे
- तांदूळ धुवून उकळत्या दुधात घालुन भात शिजेपर्यंत उकळवणे
- गॅसवरून उतरवून त्यात बारीक चिरलेले गुळ घालणे.
- गुळ विरघळेपर्यंत ढवळणे. थंड करून खायला देणे.
टीप
दुध आणि भात मध्यम आचेवर सारखे ढवळत शिजवणे म्हणजे पायेश करपणार नाही.
0 comments:
Post a Comment