व्हॅनिला आईस्क्रीम
अजॉयचा आवडता आईस्क्रीमचा फ्लेवर. मागच्या शनिवारी जेवणानंतर मी तो बनवला. इतका उत्कृष्ठ आणि सोपा होता की मी तो अजून पर्यंत एकदाही का नाही बनवला असाच विचार मनात येतो.
साहित्य
१ लिटर दुध
३.५ वाटी क्रीम
२ वाटी साखर
१/४ वाटी व्हॅनिला इसेन्स
कृती
- मिक्सरमध्ये साखर आणि अर्धा लिटर दुध साखर विरघळेपर्यंत फिरवणे.
- एका भांड्यात दुध-साखर मिश्रण, क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र करून फोर्कवापरून फेटणे.
- आईस्क्रीममेकरमध्ये मिश्रण घालुन आईस्क्रीममेकरच्या सूचनेप्रमाणे सेट होण्यासाठी ठेवणे.
टीप
मी आईस्क्रीममध्ये हेवी व्हिपिंग क्रीम वापरले. जर लाईट व्हीप्पिंग क्रीम वापरायचे असेल तर साधारण ४.५ वाटी वापरावे लागेल.
0 comments:
Post a Comment