पचडी
आई इथे आल्यावर ती दररोज नवीन नवीन काहीतरी बनवत असते. परवा तिनी हि मस्त पचडी बनवलेली. ती मला इतकी आवडली की मी लगेच कालच पुन्हा मला दाखवायला सांगितलं. काल आमचा बेत पाणी पुरीचा होता पण मला काही झालं तरी हि पचडी बनवायची होती म्हणून मग, पाणी पुरीच्या चटपटीत हा चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ खून जेवण संपवायचे ठरले.
साहित्य
२ वाटी कोबी
१ वाटी गाजर
१ टोमेटो
३/४ वाटी कांदा
१ चमचा शेंगदाणा पूड
१ चमचा साखर
१ मिरची
मुठभर कोथिंबीर पाने
१ लिंबू
१/४ चमचा मौव्हरी
चिमुटभर हिंग
तेल
मीठ
कृती
- कोबी बारीक चिरून एका भांड्यात घ्यावा
- त्यात टोमेटो बारीक चिरून घालणे
- कांदा, कोथिंबीर, मिरची बारीक चिरून घालणे.
- गाजर किसून घालणे.
- त्यात शेंगदाणा पूड, साखर, आणि मीठ घालणे.
- लिंबू पिळून, मिश्रण चांगले ढवळणे.
- एका छोट्या कढईत तेल घालुन मौव्हरी आणि हिंग घालुन फोडणी करणे.
- त्याला मिश्रणात घालुन चांगले ढवळणे.
टीप
जर पार्टीत किंव्हा पाहुण्यांना वाढण्यासाठी आधीपासून तयारी करायची असेल तर फक्त भाज्या चिरून ठेवणे. साखर मीठ आणि फोडणी आयत्यावेळी घालणे. जर पूर्ण पचडी आधी केली तर ती इतकी चांगली लागत नाही, त्यामुळे हा उत्तम उपाय आहे.
0 comments:
Post a Comment