डाळिंब रिफ्रेशर
खूप दिवसांपासून आम्ही भरपूर डाळिंब आणतोय. सध्या सारखी सर्दी होत असल्यानी आंबट फळे खाऊ नाही शकत आहे. काल डाळींबाचा रस करायचा ठरवला पण त्यात थोडा आंबटपणा आणायचा होता की ज्याने करून आम्हाला थोडे व्हिटॅमिन सी मिळेल आणि थोडी चटपट चव पण येईल आणि त्यातूनच हे रिफ्रेशर तयार झाले
साहित्य
२ डाळिंब
२ लिंबू
१/२ हिरवी मिरची
३ चमचा साखर
१.५ ग्लास पाणी
चिमुटभर आले पेस्ट
कृती
- डाळींबाची साल काढून त्यातील दाणे बाजूला काढणे.
- मिक्सरमध्ये डाळिंबाचे दाणे, साखर, आले पेस्ट हिरवी मिरची घालून बारीक वाटणे.
- त्यात पाणी आणि लिंबाचा रस घालुन पुन्हा वाटणे.
- गाळून थंडगार प्यायला देणे.
टीप
हे बर्फाबरोबरपण देता येईल पण आम्हाला सर्दी असल्यानी आम्ही साधे पाणी वापरून विनाबर्फ प्यायले आणि तरी सुद्धा छान लागले
0 comments:
Post a Comment