दुधीभोपळा आणि कोथिंबीर पराठे
हा अजून एक पदार्थ आमच्याकडे असलेल्या भोपळ्याचा बनवला. एकदम सुंदर झालेला.
साहित्य
२ वाटी किसलेला दुधीभोपळा
६-७ चमचाभरून पीठ
१ वाटी कोथिंबीर
२ चमचा क्रीम
१ चमचा आलं लसूण पेस्ट
१ चमचा हळद
२ चमचा तिखट
मीठ
तेल
कृती
- किसलेला दुधीभोपळा कुकरमध्ये पाणी न घालता उकडून घेणे.
- शिजलेल्या भोपळ्यात आलं लसूण पेस्ट, हळद, कोथिंबीर, तिखट, मीठ, क्रीम आणि चमचाभर तेल घालणे
- त्यात गव्हाचे पीठ घालुन पीठ मळून घेणे. अर्धा तास भिजायला ठेवणे.
- पराठे लाटून घेणे व मध्यम आचेवर तव्यावर भाजून घेणे
टीप
ह्या अर्धा वाटी चिरलेली मेथी पण घालता येईल.
0 comments:
Post a Comment