पोहे चाट
आई इथे आली होती तेंव्हा तिनी तिच्याबरोबर १-२ पाककृतीची पुस्तके आणलेली त्यातच हा पदार्थ बघितलेला. आज मी हा करून बघितला.
साहित्य
२ वाटी पातळ पोहे
२ बटाटा
१/२ चमचा आलं पेस्ट
४-५ मिरच्या
१/२ वाटी दही
१-२ चमचा साखर
मीठ
म्हवरी
चिमुटभर हळद
१ चमचा चिंचेची चटणी
तेल
कृती
- बटाटे उकडून घेऊन थंड करणे.
- पोह्यावर थोडेसे पाणी शिंपडून त्यांना मऊ करावं
- त्यात किसलेला बटाटा, आलं पेस्ट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ एकत्र करणे व पीठ भिजवणे. ह्याचे गोळे करून अलग दाबून टिक्या बनवणे
- टिक्या तव्यावर भाजून घेणे.
- दही व साखर एकत्र करणे.
- तेल गरम करून त्यात म्हवारीची फोडणी करणे. त्यात हळद घालुन ते तेल दह्यात घालुन हलवणे.
- वाढताना पोह्याच्या टिक्कीवर दही आणि चिंचेची चटणी घालुन देणे.
टीप
पोह्याची टिक्कीवर ब्रेडक्रम लावून पण टाळता येईल.
बारीक शेव वारणा घालण्याचा माझा विचार होता पण माझ्याकडे शेव नसल्यानी घातले नाही पण नंतर एकदा मी करून बघणारे
0 comments:
Post a Comment