हिरवी तिखट चटणी
मी हि चटणी मुद्दामून चाटसाठी बनवते. पण पराठ्याबरोबर सुद्धा हि एकदम मस्त लागेल.
साहित्य
१/४ वाटी पुदिना
१.५ वाटी कोथिंबीर
४-५ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा साखर
मीठ
कृती
- मिक्सरमध्ये पुदिन्याची पाने, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि चमचाभर पाणी घालुन वाटणे.
- साखर घालुन पुन्हा एकम बारीक वाटणे.
टीप
ह्या चटणीत थोडा चाट मसाला आणि आमचूर पूड पण घालता येईल. पराठ्याबरोबर अशी चटणी एकदम मस्त जाईल.
0 comments:
Post a Comment