इडली
मी बरेच लोकांना बाहेरून इडलीचे पीठ आणताना किंवा इंस्टन्ट मिश्रण वापरताना बघितलय पण मला त्याची चव फार काही आवडत नाही. इडली करायला इतकी सोपी आहे की आज काल अजॉयसुद्धा एखाद वेळी बनवतो.
साहित्य
१ वाटी उडीद डाळ
२ वाटी इडली रवा
मीठ
तेल
कृती
- उडीद डाळ आणि इडली रवा वेग वेगळ्या भांड्यात कमीत कमी ८ तास भिजवून ठेवणे.
- उडीद दालीतील पाणी काढून बारीक वाटून घेणे.
- इडलीच्या राव्यातील पाणी पण काढून ते पण वाटून घेणे.
- दोन्ही वाटलेले मिश्रण एकत्र करून ८ तास आंबावण्यासाठी उबदार जागी ठेवणे.
- सकाळी पिठात मीठ घालुन फेटून घेणे.
- कुकरमध्ये पाणी घालुन उकळवणे.
- इडलीच्या भांड्यांना तेलाचा हात लावून त्यात पीठ घालणे.
- इडली भांडी कुकरमध्ये ठेवून झाकण लावून (शिट्टी न लावता) १०-१२ मिनिट मोठ्या आचेवर उकडून घेणे.
- कुकर उकडून इडली २-३ मिनिट थंड करणे व मग काढून खायला देणे.
टीप
इथे हवामान थंड असल्यानी पीठ आंबावण्यासाठी गरम पाणी भरलेल्या भांड्यावर ठेवले.
इडली उकडल्या उकडल्या कुकरचा झाकण काढायला विसरू नये नाहीतर वाफेच पाणी जाऊन इडल्या मऊ होतील
0 comments:
Post a Comment