मटारची भाजी आणि सामोसा
आई बऱ्याच वेळा सामोसा बनवायची. तो माझा सगळ्यात आवडीच्या पदार्थांपैकी एक होता, असेल आणि आहे :) प्रत्येक वेळा ते बनवताना माझी मदत आणि अर्थातच कमिशनपण वाढत गेल :D आता मां बाबा इथे आल्यावर मी सामोसा बनवून त्यांना इम्प्रेस करायचा ठरवलं :) [सामोसा बनवणे हे पहिल्यांदा खूप किचकट आणि कष्टच काम वाटत पण २-३ वेळा केल्यावर पाहुण्यांना देण्यासाठी एकदम सोपा आणि रुचकर पदार्थ आहे]
मटारची भाजी
साहित्य
३ वाटी मटार
१ बटाटा
१ चमचा मौव्हरी
१ कांदा
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आलं पेस्ट
३-४ हिरव्या मिरच्या
१ चमचा जीरा पूड
१ चमचा धने पूड
मीठ
तेल
कृती
- कढईत तेल गरम करून त्यात माव्हारीची फोडणी करणे
- त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण पेस्ट, आलं पेस्ट आणि हिरव्या मिरच्या (बारीक चिरून) घालणे
- कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्यात जीरा पूड आणि धने पूड घालणे.
- त्यात बटाट्याचे तुकडे, मटार आणि पाणी घालुन बटाटे पूर्णपणे शिजवणे.
- चवीपुरते मीठ घालुन भाजी सुकवणे.
टीप
भाजी फक्त भाजीम्हणून वापरायची असेल तर थोडी पातळ ठेवायला हरकत नाही पण सामोस्यासाठी वापरायची असेल तर सुकीच पाहिजे
भाजीमध्ये थोडा शेंगदाण्याचा कुट पण घालता येईल
सामोसा
साहित्य
५ चमचा भरून मैदा
२ वाटी मटारची भाजी
तेल
कृती
- ४ चमचे मैदा थोडा तेल आणि थंड पाणी वापरून भिजवणे
- बाकीचा मैदा थोड्या पाण्यात भिजवून पेस्ट बनवणे.
- भिजलेल्या पीठाचे छोटे गोळे घेऊन पातळ लाटणे
- लाटलेली चपाती तेल न लावता तव्यावर मंद आचेवर अर्धवट भाजणे
- आता त्या चपातीला अर्धे करणे
- प्रत्येक अर्धी चपाती घेऊन त्याचा कोन करणे
- मैद्याची पेस्ट लाऊन कोन नीट चिकटवणे
- त्यात थोडी मटारची भाजी भरून कडा नीट बंद करणे.
- तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजणे
टीप
चपाती दुमडून कोन बनवताना, तो असा बनला पाहिजे की तो दाबला तर तो त्या चपातीचा १/३ अंश असला पाहिजे
तसेच सोमासा भजी भरून बंद करताना असा बंद करायचा की दुमडलेल्या कडा उजवी आणि डावीकडे असतील
0 comments:
Post a Comment