कॉर्न आणि कैरी चाट
ही पाककृती मी स्वतः बनवली आहे. :) कैरीला तिखट मीठ लावून हा माझा आवडता पदार्थ. तसाच कॉर्नवरती तिखट, मीठ आणि लिंबू हा पण. त्यामुळे ह्या दोन्ही पदार्थांची प्रेरणा घेऊन मी ही पाककृती बनवली. चविष्ठ.
साहित्य
३-४ वाटी ताजे किंव्हा फ्रोझन कॉर्न
१ कैरी
१ चमचा लोणी
तिखट चवीनुसार
मीठ
२ चमचे कोथिंबीरीची पानं (इच्छेनुसार)
कृती
- कॉर्न कुकरमध्ये उकडून घ्यावेत
- कैरी किसावी
- कढईत लोणी विरघळावे
- त्यात उकडलेले कॉर्न, कैरी, तिखट, मीठ घालुन हलक्या हातानी ढवळणे
- थोडे कोमट होईपर्यंत आचेवर ठेवावे.
- कोथिंबीरीची पानं घालुन सजवणे
टीप
हा पदार्थ थोडा मसालेदारच छान लागतो त्यामुळे कंजूसी न करता तिखट घालणे. :)
0 comments:
Post a Comment