कॉर्न पॅटिस


हि माझ्या आईची पाककृती.. एकदम छान होते आणि करायलापण एकदम सोपी. आई कशी करायची ते मला आता आठवत नाही. तिला ते बनवताना बघून बरेच दिवस झाले, त्यामुळे आता फक्त वर वरूनच लक्षात आहे ती जे काही करायची. त्यामुळे आई करते तशी नसली तरी आज एकदम मस्त झाल्यामुळे मी इथे पोस्ट करतीये.

कॉर्न पॅटिस
साहित्य
२ बटाटे
१ वाटी कॉर्न
१ चमचा जीरा पूड
१ चमचा तिखट
१/२ चमचा धने पूड
१/२ चमचा लसूण पेस्ट
१-२ चमचे कॉर्न फ्लौर
मीठ
रवा
तेल

कृती
  • बटाटे व कॉर्न कुकरमध्ये उकडून घ्यावेत.
  • बटाटे कुस्करून त्यामध्ये तिखट, जीरा पूड, धने पूड, लसूण पेस्ट आणि मीठ घालुन चांगले मळावे.
  • त्यामाच्ये उकडलेले कॉर्न घालुन अलगद एकत्र करणे
  • कॉर्न फ्लौर घालुन मिश्रण चांगले घट्ट करावे.
  • लिंबूच्या आकाराचे गोळे बनवून त्यांना चपटे करावे.
  • तवा गरम करून त्यावर थोडे तेल घालावे
  • बनवलेले पॅटिस रव्यामध्ये घोळवून तव्यावर टाकावेत.
  • दोन्हीबाजूनी गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर भाजावेत

टीप
कॉर्न फ्लौरमुळे पॅटिसाचे मिश्रण दाट होते, तसे नसल्यास ते भाजताना तेलात विरघळू शकतात. साधारण १-२ चमचे कॉर्न फ्लौर पुरे पडते पण जर मिश्रण तरीसुद्धा पातळ वाटल तर अजून थोडा कॉर्न फ्लौर घालण्यासाठी संकोच करू नये
कॉर्नच्या ऎवजी मटार घालुन मटार पॅटिस पण असेच बनवता येतील

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP