गुलाब आणि सुकामेव्याचा मिल्कशेक
मी पुण्याहून ह्यावेळी थोडा गुलकंद घेवून आलेले. आज फार जास्त गरम नव्हता पण फ्रीजमध्ये आईस्क्रीम आणि बाहेर शेल्फवर गुलकंद बघून मी हा मिल्कशेक बनवण्याचे ठरवले. एकदम सुंदर आणि शांत शुक्रवारची संध्याकाळ.
साहित्य
६ वाटी दुध
२ वाटी व्हॅनिला आईसक्रीम
१/३ वाटी काजू
१/३ वाटी बदाम
१/३ वाटी पिस्ता
१/२ वाटी साखर
२ चमचे गुलकंद
चिमुटभर लाल रंग
कृती
- मिक्सरमध्ये काजू, बदाम, पिस्ता घालुन बारीक पूड करून घेणे.
- त्यात गुलकंद, आईस्क्रीम घालुन पुन्हा वाटणे.
- त्यात दुध, साखर आणि लाल रंग घालुन शेक होईपर्यंत वाटणे.
टीप
मी थोडा सुकामेवा अर्धवट वाटून वापरला त्यामुळे त्यांचे तुकडे शेक पिताना मध्ये मध्ये येत होते आणि त्याची चव अजून जास्त चांगली लागली
थोड सजवण्यासाठी मी लाल रंग १-२ थेंब पाण्यात घालुन चमच्याची मागची बाजू त्यात बुडवून शेकवरती डिझाईन बनवली.
0 comments:
Post a Comment