मुंग डाळ वडा
बरेच दिवसांनी मी माझ्याकडच्या पाककृतीच्या पुस्तकातून काहीतरी बनवण्याचे ठरवले. हि पाककृती एकदम तशीच्या तशी नाहीये पण त्यातील एका वाचलेल्या कृतीवरून प्रेरणा घेतलेली आहे.
साहित्य
१ वाटी मुंग डाळ
२ चमचे बेसन
६ लसुणाच्या पाकळ्या
१ इंच आलं
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा जीरा
१/२ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
चिमुटभर खाण्याचा सोडा
मीठ
तेल
कृती
- मुंग डाळ पाण्यात ५-६ तास भिजवून ठेवणे.
- डाळ भिजवल्यावर, लसूण, आले, मिरची आणि जीरा घालुन मिक्सरमध्ये १-२ चमचे पाणी घालुन जाडसर वाटणे.
- त्यात डाळीतून पाणी उपसून ती घालुन बारीक वाटणे.
- वाटलेल्या पिठात बेसन, तिखट, हळद, मीठ आणि खाण्याचा सोडा घालुन चांगले एकत्र करणे.
- कढईत तेल गरम करून थोडे थोडे पीठ घालुन वडे तळणे.
टीप
पाककृतीत अजून खोबरे, कांदा, कडीपत्ता वगैरे पण घालायला सांगितलेला पण मला हे वडे असेच आवडले आणि त्याबरोबर खोबर्याची चटणी एकम मस्त लागली
0 comments:
Post a Comment