दुधीभोपळ्याचा कोफ्ता
अजॉयला भोपळ्याचा कोफ्ता फार आवडतो, इतका की पुण्याला गेल्यावर मां त्यासाठी नेहमी बनवते. मागच्या वर्षापर्यंत आम्ही खूप वेळा पुण्याला जायचो त्यामुळे मी हे कधीच नाही बनवलं पण इथे आल्यापासून आम्ही दोघेसुद्धा कोफ्ता फार मिस करतो. त्यामुळे आता मांकडून ह्याची कृती घेऊन मी आज कोफ्ता बनवला.
साहित्य
३ वाटी दुधीभोपळा
१ वाटी गाजर
१.५ वाटी बेसन
३ चमचा कॉर्न फ्लौर
२ कांदे
२ टोमाटो
२ वाटी दही
४ चमचे साखर
१/२ चमचा चाट मसाला
१/२ चमचा जीरा
१.५ चमचा तिखट
१/२ चमचा हळद
१ चमचा धने पूड
१ चमचा जिरे पूड
१ हिरवी मिरची
१/४ वाटी काजू
१/४ वाटी मनुका
तेल
मीठ
कृती
- दुधीभोपळा आणि गाजर किसून घेणे.
- तेल गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे.
- त्यात किसलेला दुधीभोपळा आणि गाजर घालुन सारखे हलवत सुकेपर्यंत शिजवणे.
- कढईत तेल गरम करून त्यात कांदा भाजणे व बाजूला ठेवणे
- मिक्सरमध्ये टोमाटो, तिखट, जीरा पूड, धने पूड आणि मीठ वाटून घेणे
- त्यात शिजवलेला कांदा घालुन बारीक वाटणे.
- दुधीभोपळ्याच्या मिश्रणात बेसन घालुन मऊ पीठ भिजवणे.
- मिश्रणाचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून त्यात काजू, मनुका आणि बारीक हिरवी मिरचीचे तुकडे घालणे.
- कोफ्ता तेलात गुलाबी रंगावर तळून घेणे.
- कढईत वाटलेली पेस्ट, ३ वाटी पाणी घालुन ५-६ मिनिट उकळवणे.
- त्यात कोफ्ता घालुन अजून थोडा वेळ उकळवणे.
- एका भांड्यात दही, साखर आणि चाट मसाला एकत्र करणे.
- वाढताना वाटीत कोफ्ता आणि त्याची कढी घालणे. त्यावर दही पसरवणे व किसलेले गाजर, काजू, मनुका घालुन देणे.
टीप
गाजराच्याऎवजी कच्चे केळेपण वापरता येईल
0 comments:
Post a Comment