पनीरभरा कबाब
आज फ्रीज उघडल्यावर लक्षात आले की माझ्याकडे २ लिटर दुध आहे ज्याची शेवटची तारीख उद्याची आहे. काही गोड बनवण्याचा कंटाळा आल्यानी, मी हा पदार्थ शोधला.
साहित्य
२ लिटर दुध
५ चमचे व्हिनेगर
१ वाटी कोथिंबीर
२ चमचा पुदिना
५-६ मिरच्या
२ ब्रेडचे तुकडे
१/२ चमचा चाट मसाला
मीठ
तेल
कृती
- दुध उकलाव्रून त्यात एक्वाती पाण्यात व्हिनेगर टाकून घालणे.
- पनीर तयार झाले की लगचे धुवून आणि गाळून घेणे.
- पंचात अर्धा ते एक तास टांगून ठेवणे.
- ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे.
- त्यात ब्रेडचे तुकडे ५ मिनिट ३५०F/१८०C वर भाजून घेणे. तुकडे परतून पुन्हा ५ मिनिट भाजणे.
- मिक्सर मध्ये वाटून ब्रेडक्रम बनवणे.
- मिक्सरमह्ये कोथिंबीर, पुदिना आणि मिरच्या घालुन पाणी न घालता वाटून घेणे.
- परातीत पनीर, मीठ, आणि वाटलेले मिश्रण घालुन मळणे.
- लिंबाच्या आकाराचे गोळे करून ब्रेडक्रम मध्ये घोळवून तेलात मध्यम आचेवर तळून घेणे.
- वरून चाट मसाला शिंपडून सॉस बरोबर खायला देणे.
टीप
जर पनीर बनवायचे नसेल तर बाजारातील पनीर किसून वापरता येईल पण फ्रेश पनीरनी खूप सुंदर चव आणि मऊपणा येतो आणि तरी सुद्धा बाहेरून एकदम कुरकुरीत बनतात.
कोथिंबीर, पुदिना आणि मिरच्या वाटणा पाणी न घालता धुतलेल्या भाज्यावाराचे पाणी पुरेसे पडते.
0 comments:
Post a Comment