फ्राईड चिकन
आम्ही बँगलोरमध्ये असताना केफसी मध्ये बऱ्याचवेळी जायचो, खूप साऱ्या आठवणीसुद्धा आहेत. पण इथे आल्यापासून आम्ही एकदासुद्धा केफसीमध्ये नाही गेलोय. त्यामुळे फ्राईड चिकन खाऊन बरेच दिवस झालेत. त्यामुळे आज मी ते बनवण्याचे ठरवले.
साहित्य
५ चिकनचे लेग तुकडे
१ अंडे
३/४ वाटी मैदा
५ चमचे ब्रेडक्रम्स
१ चमचा तिखट
१/४ चमचा ओरिगानो
१/४ चमचा मिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा लसूण पेस्ट
मीठ
तेल
कृती
- धार धार सुरीनी चिकनच्या तुकड्यांना चिरा पडणे.
- गरम पाण्यात १/२ चमचा तिखट, ओरिगानो, मिरे पूड आणि मीठ घालणे.
- त्यात चिकनचे तुकडे घालुन एक तास भिजवणे
- एका भांड्यात अंडे, लसूण पेस्ट, उरलेले अर्धा चमचा तिखट, धने पूड आणि मीठ घालणे.
- ताटलीत मैदा, ब्रेडक्रम्स आणि मीठ एकत्र करणे.
- चिकनच्या तुकड्यातून पाणी निथळून टाकणे. प्रत्येक चिकनचा तुकडा अंड्याच्या मिश्रणात दुबवाने व नंतर मैद्याच्या मिश्रणात घोळवणे.
- तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर गुलाबी रंगावर चिकनचे तुकडे तळणे.
टीप
चिकनचे तुकडे पाण्यात भिजवाल्यानी ते थोडे मऊसर होते. मी त्यात थोडे मसाले घातले त्यामुळे थोडी चव चिकनला लागते.
चिकन मध्यम आचेवर भाजल्यानी ते एकदम चांगले शिजले व ते बाहेरून करपलेपण नाही.
मी ब्रेडक्रम्स पनीरभरा कबाब बनवताना जास्त बनवून ठेवलेले.
0 comments:
Post a Comment