आले कॉर्न फ्लॉवर
अजॉयला फ्लॉवर फार आवडतो आणि त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी फ्लॉवरची भाजी होते. बऱ्याच प्रकारे मी त्यामध्ये थोडा वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करते. आज मी आल्याचा वापर करण्याचे ठरवले आणि त्याची उग्रता कमी करण्यासाठी त्यात कॉर्नचा वापर केला.
साहित्य
१ फ्लॉवर
१ वाटी कॉर्न
१ चमचा आले
२ टोमाटो
१ कांदा
३/४ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/४ चमचा धने पूड
मीठ
तेल
कृती
- कढईत तेल गरम करून त्यात फ्लॉवरचे तुकडे गुलाबी रंगावर तळून घेणे.
- कढईत तेल गरम करून त्यात कांदा भाजणे.
- त्यात आले घालुन अजून एक मिनिट भाजणे
- तिखट, हळद, धने पूड घालुन अजून १-२ मिनिट भाजणे.
- टोमाटो वाटून त्यात घालणे व दोन मिनिट शिजवणे.
- त्यात स्वीटकॉर्न, मीठ घालुन ५-६ मिनिट चांगले सुकेपर्यंत शिजवणे.
- तळलेला फ्लॉवर त्यात मिसळून २-३ मिनिट शिजवणे.
टीप
फ्लॉवरला जास्त काळे करू नये कारण तेलातून बाहेर काढल्यानंतर तो अजून थोडा गडद होतो.
0 comments:
Post a Comment