कोल्ड कॉफी
सगळ्यात पहिल्यांदा मी इंस्टंट पूड वापरून कोल्ड कॉफी बनवायला चालू केलेला. माझ्या बहिणीला टी खूप आवडायची त्यामुळे कधीही कोल्ड कॉफी म्हटले की मला तिचीच आठवण येते. कोल्ड कॉफी आणि बहिण असे एक समीकरणच झालेय. आवडीबरोबरच बरेच काही प्रसंग आणि आठवणीपण आहेत. इथे आल्यापासून कॉस्कोचे डीलचे कुपन वापरून आम्ही भरपूर बाटल्या ह्या स्टारबक्स बनवते त्या पिल्या. पण थोडे दिवसांनी मला फ्रेश थंड कॉफीची फारच कमी वाटायला लागली आणि मी हि घरीच बनवायला चालू केली. मला भारतात सीमासाठी हि बनवण्याची फार इच्छा होती पण सर्दी खोकला यामुळे नाही करता आली. इथे मी पाककृती देतीये आणि अशी आशा करते की ती हि बनवेल आणि आमचे सोनेरी दिवस जेंव्हा आम्ही वेड्यासारखे कॉफीच्या मागे होतो ते आठवेल
साहित्य
४ वाटी दुध
२ वाटी व्हॅनिला आईसक्रीम
१.५ चमचा कॉफी पूड
५ चमचे साखर
कृती
- एक वाटीभर पाणी उकळवून त्यात साखर विरघळवणे
- त्यात कॉफी घालुन विरघळवणे व थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
- मिक्सरमध्ये आईस्क्रीम, कॉफी आणि दुध घालुन फिरवणे.
- चांगले फेस येई पर्यंत फिरवणे आणि थंड खायला देणे.
टीप
आईस्क्रीम वापरल्यानी कॉफी लगेच प्यायला देता येते व नंतर थंड करावी लागत नाही.
0 comments:
Post a Comment