चिकन साते
चिकन साते हि माझी थाई प्रकारची एकदम आवडती डीश. ह्या आधी जेव्हा बनवलेला तेंव्हा फोटो काढायच्या आधीच संपून गेलेले. त्यामुळे ह्यावेळी पहिल्यांदाच फोटो काढून घेतला.
साहित्य
४०० ग्राम बोनलेस चिकन ब्रेस्ट
१ चमचा ब्रावून शुगर
२ लसुणाच्या पाकळ्या
१ चमचा धने पूड
१ चमचा जिरे पूड
१/४ चमचा हळद
१ चमचा मिरे पूड
२ चमचे तेल
२ चमचे सोया सॉस
२ चमचे लिंबाचा रस
१/२ वाटी दुध
मीठ
कृती
- चिकन ब्रेस्टचे पातळ आयताकृती तुकडे करणे.
- त्याला ब्रावून शुगर, लसुणाच्या पाकळ्या, धने पूड, जिरे पूड, हळद, मिरे पूड, तेल, सोया सॉस, लिंबाचा रस आणि मीठ लावून घेणे.फ्रीजमध्ये ४ तास ठेवणे.
- प्रत्येक चिकनची पट्टीमध्ये काडी घालणे. प्रत्येक काडीला २ चिकनच्या पट्ट्या लावणे.
- चिकनला थोड्या दुधामध्ये भिजवून घेणे.
- नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर चिकन मध्यम आचेवर, प्रत्येक २-३ मिनिटांनी परतून, पूर्ण शिजेपर्यंत भाजणे
टीप
मी बऱ्याच पाककृतीमध्ये फिश सॉस घालावे असे वाचले पण थोडे फार वाचल्यावर कळले की ते खारट पाण्यासारखे असते आणि बऱ्याच वेळी मीठाऐवजी वापरले जाते. त्यामुळे फिश सॉसच्याऎवजी नेहमीचे मीठ वापरले.
0 comments:
Post a Comment