व्हेज पिझ्झा
बरेच दिवस झाले मला हा पिझ्झा बनवायचा होता. घरी बनवला की इंडिअन चव करता येते. बऱ्याच भाज्या मी माझ्या मनानी घातल्या पण चव एकदम उत्कृष्ठ होती.
साहित्य
४ वाटी गव्हाचे पीठ
२ वाटी मैदा
२ वाटी दुध
१/४ वाटी ओलिव्ह तेल
१/४ वाटी लोणी
१/२ चमचा साखर
२.२५ चमचा यीस्ट
३ टोमाटो
२ चमचा लसूण पेस्ट
२ चमचा बेसिल
१/२ चमचा मिरे पूड
२ चमचा तिखट
३ चमचा सॉस
१ वाटी पार्मेसन चीज
२ वाटी मोझ्झारेल्ला चीज
१ वाटी पनीर
१.५ वाटी वांगे
८ भेंडी
१ वाटी स्वीटकॉर्न
मीठ
तेल
कृती
- साखर आणि यीस्ट एक वाटी कोमट पाण्यात घालुन झाकून १० मिनिट ठेवणे. पाण्यात बुडबुडे आले पाहिजेत.
- परातीत गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, ओलिव्ह तेल आणि वितळवलेले लोणी एकत्र करणे.
- त्यात यीस्टचे पाणी आणि दुध घालुन मऊसर पीठ भिजवणे. काचेच्या भांड्यात झाकण किंवा प्लास्टिक लावून २ तास ठेवणे.
- तेल गरम करून त्यात लसूण पेस्ट घालुन छान वास सुटेपर्यंत भाजणे.
- त्यात बेसिल, मिरे पूड, तिखट, मीठ घालुन २ मिनिट शिजवणे.
- टोमाटो वाटून त्यात घालणे. सॉसपण घालणे व पूर्ण सुकेपर्यंत शिजवणे व बाजूला ठेवणे.
- तेलात भेंडी, पनीर, वांग्याचे तुकडे तळून घेणे. भेंडीचे देठ काढून त्याला उभी चिरावी. भाज्यांवर मीठ टाकून बाजूला ठेवणे.
- पीठ दुप्पट झाले की त्याचे २ भाग करून पिझ्झाच्या तव्यावर पसरवणे.
- टोमाटोचा मसाला पिझ्झावरती पसरवणे.
- त्यावर पार्मेसन चीज, तळलेल्या भाज्या आणि स्वीटकॉर्न पसरवणे.
- मोझ्झारेल्ला चीज पसरवणे.
- ओव्हन ४००F/२००C वर गरम करणे.
- पिझ्झा २५ मिनिट ४००F/२००C वर भाजणे.
टीप
भेंडी तळताना मी अख्खी देठासकट तळली त्यामुळे त्यातल्या बिया बाहेर येत नाहीत
सगळ्या भांज्याना हलका गुलाबी रंग येईपर्यंतच भाजले त्यामुळे छान लागते. जास्त भाजू नये कारण ओव्हनमध्ये भाज्या अजून शिजतात.
खुप छान पदार्थ आहेत
पिझ्झा ओव्हन शिवाय तव्यावर बनवता येतो काय़?
@pramod, I haven't tried it without oven