चिली कोळंबी
आज मला कोळंबीचे काहीतरी लवकर बनणारे पण नेहमीच्या कोळंबी मसाल्यापेक्षा वेगळे काहीतरी बनवायचे होते. आणि मी हा पदार्थ बनवला.
साहित्य
३०० ग्राम कोळंबी
१ चमचा लसूण पेस्ट
१ कांदा
४ हिरव्या मिरच्या
४ चमचे सोया सॉस
२ चमचे टोमाटो सॉस
२ चमचे कॉर्न फ्लौर
मीठ
तेल
कृती
- कोळंबीला लसूण पेस्ट आणि मीठ लावून ठेवणे.
- तेलात तव्यावर कोळंबी १ मिनिट भाजून घेणे.
- त्याच तेलात उभ्या कापलेल्या मिरच्या, कांदा घालुन सारखे ढवळत शिजवणे.
- त्यात सोया सॉस, टोमाटो सॉस घालुन अजून २ मिनिट शिजवणे.
- कोळंबी घालुन अजून एक मिनिट शिजवणे.
- एका वाटी कॉर्न फ्लौर आणि २ वाटी पाणी घालणे व एकत्र करणे. कोळंबीमध्ये घालुन ३-४ मिनिट शिजवणे.
टीप
माझ्याकडे कांद्याची पात नव्हती त्यामुळे मी तो घातला नाही पण वरून त्याचे पाने कापून घातले तर अजून चांगले वाटेल.
0 comments:
Post a Comment