कोळंबीचे सॅन्डविच
सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्या. माझे नवीन वर्ष एकदम शांत होते, खूप जास्त जेट लॅगमुळे ९ वाजेपर्यंत जागणेपण मुश्कील झालेय. हि पाककृती खास आहे कारण ह्याची तयारी आदल्यावर्षी कायला चालू केली आणि पदार्थ ह्या वर्षी तयार झाला. हा मी अजॉयच्या खास मागणीवर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवला.
साहित्य
१४-१६ ब्रेडचे तुकडे
४०० ग्राम कोळंबी
१/२ वाटी आम्बवलेली काकडी
४ चमचे दही
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/२ चमचा मिरे पूड
१/४ चमचा चाट मसाला
१/४ चमचा जीरा पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
१/२ वाटी लोणी
मीठ
कृती
- दही, तिखट, हळद, धने पूड, मिरे पूड, जीरा पूड, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ एकत्र करणे.
- कोळंबीचे बारीक तुकडे करून ते दह्याच्या मिश्रणात घालुन एकत्र करणे व फ्रीजमध्ये ४-५ तास ठेवून देणे.
- तवा गरम करून त्यात १/४ वाटी लोणी आणि कोळंबीचे मिश्रण घालणे.
- तेज आचेवर सारखे परतत मिश्रण सुकेपर्यंत शिजवणे.
- सॅन्डविच बनवण्यासाठी ब्रेंडच्या तुकड्यांवर आम्बवलेली काकडी आणि शिजवलेले कोळंबीचे मिश्रण घालुन लोणी लावून ग्रील करणे.
टीप
कोळंबीचे बारीक तुकडे केल्यानी एका घासातच पूर्ण कोळंबी निघून येणार नाही.
0 comments:
Post a Comment