कलिंगड स्प्लॅश
आजच्या जेवणानंतर मला कलिंगडाच काहीतरी नवीन बनवण्याचं मन केल आणि त्यातूनच ही ज्यूसची पाककृती आली.
साहित्य
१/२ कलिंगड
२ मोठे लिंबू
४ चमचे साखर
६-७ पुदिना पानं
१/४ चमचे चाट मसाला
१/४ चमचे जिरे पूड
चिमुटभर मिरे पूड
मीठ चवीनुसार
कृती
- कलिंगड चिरून मिक्सरच्या भांड्यात घालणे
- त्यात लिंबू रस, साखर, पुदिना पानं, मीठ, जीरा पूड, चाट मसाला घालणे
- मिक्सरमध्ये ज्यूस चांगला वाटून घेणे
- ज्यूस ग्लासमध्ये ओतून त्यावर मिरे पूड शिंपडणे. ज्यूस थंड होण्यासाठी ठेवून देणे.
- वरून पुदिना पानं आणि कलिंगडाचे गोळे घालुन प्यायला देणे.
टीप
ज्यूस लवकर थंड होण्यासाठी मी १० मिनिट त्याला फ्रीजरमध्ये ठेवून दिला. त्याऎवजी थंड कलिंगड वापरल तर १० मिनिटपण वाट बघावी लागणार नाही :)
मी बीनबियांचे कलिंगड वापले त्यामुळे मला बिया वेगळे काढण्याचे कष्ट घ्यावे नाही लागले.
0 comments:
Post a Comment