खजुराचे लाडू
काल असेच इंटरनेटवर हि पाककृती दिसली आणि घरात असलेल्या सगळ्या साहित्यातून हि डीश बनत असल्यानी लगेच बनवली
साहित्य
२ वाटी बियाविना खजूर
१ वाटी काजू
१ वाटी बदाम
१ वाटी सुके खोबरे
१ वाटी खसखस
१ चमचा तूप
कृती
- कढईट तूप गरम करून त्यात खजूर घालणे.
- खजूर शिजेपर्यंत परतणे व नंतर थंड करण्यासाठी बाजूला ठेवणे.
- काजू आणि बदाम वेगवेगळे बारीक वाटणे.
- शिजवलेले बारीक खजूर बारीक वाटणे
- खजुराची पेस्ट, बदाम पूड, काजू पूड, सुके खोबरे आणि खसखस एकत्र करणे.
- लिंबाच्या आकाराचे लाडू वळणे.
टीप
एकदम सोप्पी आणि पटकन बनणारी हि कृती एकदम छान आहे आणि प्रसादासाठी एकदम चांगला आहे
0 comments:
Post a Comment