मेथी पुरी
थोड्या दिवसांआधी मला इंडिअन मार्केट मध्ये एकदम छान मेथी मिळाली. नेहमीच्या पराठ्या आणि भाजीऎवजी काहीतरी वेगळ करायचा म्हणून हि पुरी केली. पहिल्याच प्रयत्नात एकदम सुंदर आणि चविष्ठ झालेली हि पुरी इथे देत आहे.
साहित्य
१ मेथी गड्डी
२ वाटी मैदा
१ वाटी गव्हाचे पीठ
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा आले
४-५ लसूण पाकळ्या
मीठ
तेल
कृती
- मेथी धुवून मिक्सरमध्ये घालणे.
- त्यात लसूण, आले, मिरच्या आणि अर्धा वाटी पाणी घालुन एकदम बारीक वाटणे.
- परातीत मिश्रण ओतून त्यात मैदा, गव्हाचे पीठ आणि मीठ घालुन चांगले मळणे.
- पिठाच्या गोळ्याला २-३ थेंब तेल लावून झाकून भिजण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवणे.
- कढईत तेल गरम करून त्यात छोट्या पुऱ्या लाटून तळणे. दोन्ही बाजू गुलाबी झाल्याकी बाहेर काढणे.
टीप
मेथीचे मिश्रण बारीक वाटणे फार गरजेचे आहे नाहीतर लसूण, आल्याचे तुकडे लाटताना मध्ये मध्ये येऊन पुऱ्या फाटतील व फुलणार नाहीत.
मला पीठ भिजवताना आजून पाणी वापरावे लागले नाही. पण जरुरी वाटल्यास अजून पाणी किंवा पीठ वापरून मळणे.
0 comments:
Post a Comment