Mar 2011
01
कडबोळी
दिवाळी होऊन बरेच महिने झाले तर मग आज कडबोळी? पण वेफर्सपेक्षा कडबोळी खाता खाता वर्डकप बघायला मजा येईल असा वाटल्यावर रविवारी रात्री उशिरा मी त्यांना बनवायला घेतलं. लवकरच असा लक्षात आला की एक एक कडबोळी बनवायला खूप वेळ लागत होता मग मी त्यावर एक उपाय शोधला. चकलीच्या पात्रात एक मध्ये छोटी भोक असलेली ही चकती घालुन छोटे छोटे तुकडे तळले आणि ते सिनेमा किंवा खेळ बघताना खाण्यासाठी एकदम छान जमून आले.
साहित्य
४ वाटी तांदुळाचे पीठ
३ वाटी दुध
१ वाटी लोणी
मीठ चवीपुरते
तेल
कृती
- तांदुळाच्या पिठात लोणी घालुन चांगले एकत्र करणे.
- त्यात दुध घालुन पिठाचा गोळा बनवणे.
- छोट्या लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन पोलपाटावर वळवत लांबट दोरीचा आकार देणे व नंतर गोल वळवून तेलात गुलाबी रंगावर तळणे.
- किंवा चकलीच्या पात्रात ते पीठ घालुन छोटे छोटे तुकडे तेलात घालुन भाजणे.
टीप
कडबोळी भाजताना गुलाबी झाल्या झाल्या लगेच काढावी नाहीतर करपून जातील कारण तेलातून काढल्यानंतर त्यांना थोड्यावेळानी अजून थोडा रंग चढतो.
0 comments:
Post a Comment