पालकाची भजी
साधारण एक महिना झाला हा पदार्थ बनवून पण हैदराबादमधून निघायच्या घाई गडबडीत पोस्ट करायला वेळच नाही मिळाला. त्यामुळे आज जरा वेळ मिळालाय तर इथे ५ नवीन कृती देणार आहे.
साहित्य
१ पालकाची गड्डी
१/२ वाटी बेसन
१/२ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
चिमुटभर जीरा पूड
१/२ चमचा धने पूड
मीठ
तेल
कृती
- पालक धुवून बाजूला ठेवणे.
- बेसन, तिखट, हळद, जीरा पूड, धने पूड आणि मीठ एकत्र करून पाणी घालुन भिजवणे
- कढईत तेल गरम करून त्यातील एक चमचा तेल पिठात घालणे.
- तेल चांगले गरम झाले की एका वेळी २ पालकाची पाने एकत्र पिठात बुडवून तेलात सोडणे व गुलाबी रंगावर भाजणे
टीप
मी पालकाची छोटी पाने वापरली त्यामुळे एकदम मस्त कुरकुरीत भजी झाली.
पिठात एकावेळी २ पाने भिजवल्यानी त्याची चव भाज्यात चांगली लागत होती.
0 comments:
Post a Comment