व्हेरी बेरी केक
इथे सध्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बेरी मिळतात की मी असा काहीतरी केक बनवण्याचे ठरवले.
साहित्य
३ वाटी मैदा
४ चमचे बेकिंग पूड
२ अंडी
१ वाटी लोणी
१ वाटी साखर
३/४ वाटी दुध
२ वाटी रासबेरी
२ वाटी ब्लूबेरी
३/४ वाटी ब्लॅकबेरी
६-८ स्ट्रॉबेरी
मीठ
कृती
- लोणी आणि साखर एकत्र चांगले फेटून घेणे.
- त्यात अंडी घालुन घट्ट होईपर्यंत फेटणे
- मैदा आणि बेकिंग पूड एकत्र चाळून घेणे व त्यात मीठ घालणे.
- ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे.
- अंड्याच्या मिश्रणात थोडे थोडे मैद्याचे मिश्रण घालुन फेटणे.
- मिश्रणात दुध घालुन ढवळणे.
- सगळ्या बेरी मिश्रणात घालणे. (मी सगळ्या बेरी अख्या वापरल्या, फक्त स्ट्रॉबेरीचे तुकडे करून घातले)
- केक भाजायच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यात मिश्रण ओतणे. केक ३५०F/१८०C वर ३५ मिनिट भाजणे.
टीप
मी साखर मिक्सर मध्ये वाटून घेतली त्यामुळे ती पटकन वितळते.
सगळ्या बेरी फ्रीजमधून लगेच वापरल्या त्यामुळे जास्त भाजल्या नाही जात.
फ्रोझन बेरी पण वापरता येतील. मी सुद्धा पुढच्यावेळी बेरी फ्रीजर मध्ये ठेवून तश्याच वापरून बघणार आहे.
मी केक मध्ये सॉलटेड मीठ वापरले आणि वरून मीठ पण घातले त्यामुळे मीठ जरा जास्त लागत होत. जर सॉलटेड मीठ वापरत असेल तर वरून मीठ घालू नये.
0 comments:
Post a Comment