चॉकलेट बटरक्रीम
साधारण ३ वर्षांआधी मी विल्टनचा केक डेकोरेशनचा क्लास केलेला. त्यात बरेच डेकोरेशन आणि आयसिंग बनवायला शिकवलेल. हे चॉकलेट क्रीम मी तीच कृती थोडी बदलून केलय.
साहित्य
२ वाटी डालडा
१.५ वाटी कोको पूड
१ चमचा व्हॅनिला इसेन्स
१ चमचे दुध
४५० ग्राम आयसिंग शुगर
चिमुटभर मीठ
कृती
- डालडा, इसेन्स आणि दुध एकत्र करणे
- आयसिंग शुगर आणि कोको पूड एकत्र चाळून घेणे
- ते डालडात घालून ते सगळे एकजीव होईपर्यंत एकत्र फेटणे
- मीठ घालून अजून २ मिनिट क्रिमी होईपर्यंत फेटणे
टीप
क्रीम साधारण अर्धा वर्ष फ्रीजमध्ये एअर टाईट डब्ब्यात राहू शकते
0 comments:
Post a Comment