फिश कबाब


मागच्या रविवारी मी संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी काहीतरी बनवायचे म्हणून हे कबाब बनवलेले. एकदम लवकर आणि छान झालेले.

फिश कबाब
साहित्य
२ माश्यांचे तुकडे (साधारण १८० ग्राम काट्या विना)
१ कांदा
४-५ लसूण पाकळ्या
१ चमचा आले
१/४ चमचा तिखट
१ हिरवी मिरची
१/४ चमचा मिरे पूड
१/४ चमचा दालचिनी पूड
१/४ चमचा लवंग पूड
१/२ चमचे धने पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/४ वाती कोथिम्बिर
४-५ छोट्या ढब्बू मिरच्या
१/२ लिंबू
मीठ
तेल

कृती
  • माश्याचे तुकडे कुस्करून त्यात मिरे पूड, तिखट, दालचिनी पूड, लवंग पूड, धने पूड, गरम मसाला आणि मीठ घालून एकत्र करणे
  • त्यात बारीक चिरून कांदे, ढब्बू मिरच्या, हिरवी मिरची आणि कोथिम्बिर घालणे
  • त्यात लिंबाचा रस घालून मिश्रण चांगले एकत्र करणे व कबाबचे गोळे बनवणे
  • तवा गरम करून त्यावर तेल व कबाब घालून सर्व बाजूनी गुलाबी होईपर्यंत मध्यम आचेवर परतणे

टीप
मी ह्यावेळी माशे मायक्रोवेव्हच्या ऑटो डिफ़्रोस्ट केलेले आणि ते एकदम ५ मिनिटात शलेले. नेहमीसारखे १५ मिनिट वाट बघत बसावे लागले नाही ते सुद्धा जेंव्हा आम्ही दोघेही खूप भुकेले होतो.
हे नाश्त्यासाठी, स्टार्टरम्हणून, साईड डिशम्हणून किंवा पावात घालून पण खायला देत येतिल.

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP