क्रेझिन पॅन केक
मी असे पॅन केक बरेचवेळा बनवतीये, प्रत्येक वेळा वेगळे फळ. पण आज जेंव्हा मी सुके क्रॅनबेरी घालुन ते बनवले तेंव्हा असे वाटले की हे पॅन केक मिश्रण फक्त त्याच्यासाठीच बनले आहे. त्यामुळे इथे मी आज ते पोस्ट करतीये.
साहित्य
२ वाटी मैदा
१ चमचा साखर
१.५ चमचे बेकिंग पूड
१/२ वाटी लोणी वितळवून
२.५ वाटी दुध
१ अंडे
२ चमचे व्हॅनिला ईसेन्स
१ वाटी क्रेझींस
मीठ
तेल
कृती
- अंडे आणि साखर चांगले फेटून घ्यावे
- त्यात दुध आणि वितळवलेले लोणी घालुन फेटावे
- आता त्यात व्हॅनिला ईसेन्स, चाळून घेतलेला मैदा, बेकिंग पूड आणि मीठ घालुन फेटावे
- तवा गरम करणे
- त्यावर २-३ थेंब तेल टाकणे आणि नंतर अर्धी वाटी केकचे मिश्रण घालणे.
- त्यावर थोडे क्रेझींस टाकणे व खालची बाजू गुलाबी रंग होईपर्यंत भाजणे
- २ थेंब तेल शिंपडून केक उलटवणे दुसरी बाजूसुद्धा गुलाबी होईपर्यंत भाजणे. बाकीचे सगळे केक पण असेच बनवणे.
- एकावर एक ठेवून, मॅपल सिरप घालुन वाढणे.
टीप
मी क्रेझीनसच्या ऐवजी अॅप्रिकॉट्स, ब्लू बेरीज, मनुके आणि असेच बरेच वेगळी वेगळी फळ घालुन हे पॅन केकस बनवले आहेत पण मी आधी म्हटल्याप्रमाणे क्रेझीनचे केक सगळ्यात छान लागले.
0 comments:
Post a Comment