फ्लॉवरचे लॉलीपॉप
अजॉय फ्लॉवर फार वेळा आणतो त्यामुळे त्याचे काहीतरी नवनवीन करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. थोड्या दिवसांपूर्वी मी चिकन लॉलीपॉपची कृती वाचत होते आणि मग मी तसेच फ्लॉवरचे बनवायचे ठरवले.
साहित्य
१ छोटा फ्लॉवर
२ चमचे बेसन
१ चमचा कॉर्न फ्लौर
१ चमचा तांदुळाचे पीठ
१ चमचा रवा
१/२ चमचा हळद
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/२ चमचा गरम मसाला
मीठ
तेल
कृती
- फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुकडे करणे.
- बेसन, कॉर्न फ्लौर, तांदुळाचे पीठ, रवा, हळद, तिखट, जिरे पूड, धने पूड, गरम मसाला एकत्र करणे.
- त्यात मीठ आणि पाणी घालुन जाड पीठ भिजवणे.
- कढईत तेल गरम करून त्यातील चमचाभर तेल पिठात घालणे.
- फ्लॉवरचे तुकडे पिठात भिजवून गुलाबी रंगावर तळणे व देठाला अल्युमिनियम फॉइल लावून खायला देणे.
टीप
मी पिठात थोडासा लाल रंग घातला कारण तिखटानी पुरेसा लाल रंग येत नाही
0 comments:
Post a Comment