कॉर्न पराठा
बरेच दिवस झाले मी नवीन पराठ्याचा प्रकार बनवून. काल मी पुदिना किंवा कॉर्न वापरून पराठा बनवण्याचा विचार करत असताना कॉर्न पराठ्याची कृती मिळाली, मी त्याला थोडी बदलून हा पराठा बनवलाय
साहित्य
१ वाटी कॉर्न
१ वाटी गव्हाचे पीठ
१/८ वाटी मैदा
१ बटाटा
४ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा हळद
१/४ चमचा आले पेस्ट
१/४ चमचा साखर
२ चमचे कॉर्न फ्लौर
१ वाटी कोथिंबीर
१/४ वाटी पुदिना
१ चमचा चाट मसाला
मीठ
तेल
कृती
- मैदा, गव्हाचे पीठ आणि एक चमचा तेल एकत्र करून पराठ्यासाठी पीठ भिजवणे.
- कॉर्न बारीक वाटून घेणे.
- बटाटे कुकरमध्ये उकडून घेणे.
- कढईत ३-४ चमचे तेल गरम करून त्यात बारीक वाटलेली हिरवी मिरची, हळद आणि आले पेस्ट घालणे व परतणे.
- त्यात साखर, मीठ आणि कॉर्न फ्लौर घालुन अजून थोडा वेळ शिजवणे व थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
- मिश्रण थंड झाल्यावर त्यात वाटलेले कॉर्न, किसलेला बाटतात, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि चाट मसाला घालणे.
- पराठ्याच्या पीठाचे २ गोळे घेवून ते वाटीच्या आकाराचे लाटणे.
- त्यावर कॉर्नच्या मिश्रणाचा गोळा ठेवून दुसरी पोळी ठेवणे व घट्ट बंद करणे.
- पराठा लाटून तव्यावर तेल लावून गुलाबी रंगावर भाजणे.
टीप
पराठा भाजताना मी पहिल्यांदा दोन्ही बाजू तेलाशिवाय अर्ध्या भाजल्या आणि मग थोडेसे तेल लावून भाजल्या त्यामुळे पराठा एकदम हलका होतो
मी जी कृती वाचलेली त्यात त्यानी १/४ वाटी सुके खोबरे पण वापरलेले पण माझ्याकडे ते नव्हते आणि मला ते फार काही आकर्षक वाटले नसल्यानी मी नाही वापरले.
0 comments:
Post a Comment