डूबती टायटॅनिक
मागच्या रविवारी मला ब्लॅक फॉरेस्ट केक बनवायचा होता पण माझ्याकडे केक बेक करण्यासाठी चांगले काचेचे भांडे नव्हते. साधारण १२ वाजता मी काचेचे भांडे घेण्यसाठी शोधाशोध चालू केली ती शेवटी रात्रीच्या १० वाजता संपली. आठवड्यातील दिवस फार कामाचे असल्यानी मला वेळ नाही मिळाला पण आज सकाळच्या नाश्त्यानंतर मी पहिल्यांदा केक बनवायला चालू केले. मी दोन्ही केक बनवले पण क्रीम इतके पातळ होते की ते केकवर घालताच खाली पडायला लागेले. अजॉयनी ताटलीत पडलेले क्रीम केकवर घालत राहणे चालू ठेवले आणि त्याचा निर्धार म्हणून हा प्रयोग वेगळाच पण चविष्ठ झाला.
साहित्य
३/४ वाटी मैदा
२ चमचे कोको पूड
१ चमचा बेकिंग पूड
१/४ चमचा खाण्याचा सोडा
१/२ वाटी + ४ चमचे पिठी साखर
१/४ वाटी दुध
१ चमचा लोणी
२ अंडी
१/४ चमचा व्हॅनिला इसेन्स
१/२ वाटी फ्रेश क्रीम
१ मध्यम आकाराची कॅडबरी
१/४ वाटी टीनड चेरी
२ चमचे चेरीचा पाक
चिमुटभर मीठ
कृती
- मैदा, कोको पूड, बेकिंग पूड, खाण्याचा सोडा आणि मीठ एकत्र ८-१० वेळा चाळून घेणे.
- दुध उकळून त्यात लोणी घालणे.
- केकच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यावर बटर पेपर लावून तयार करून ठेवणे.
- ओव्हन २००C वर गरम करणे.
- अंड्याचे पिवळे आणि पांढरे वेगळे करणे.
- अंड्याचे पांढरे घट्ट होईपर्यंत फेटणे.
- अंड्याच्या पिवळ्यात १/२ वाटी पीठ साखर चमचा चमचा एका वेळी घालत एकत्र करणे.
- त्यात चाललेले मैद्याचे मिश्रण थोडे थोडे घालणे व नंतर व्हॅनिला इसेन्स घालणे.
- अंड्याचे पांढरे घालुन एकत्र करणे.
- त्यात दुध आणि लोण्याचे मिश्रण घालुन एकत्र करणे.
- केकच्या भांड्यात मिश्रण ओतून केक मायक्रोवेव्ह आणि कन्व्हेक्शन मोड मध्ये १८०W १८०C वर १५ मिनिट भाजणे व थंड करण्यासाठी बाजूला ठेवणे.
- क्रीम आणि ४ चमचे साखर एकत्र फेटणे.
- कॅडबरी किसून बाजूला ठेवणे.
- केक उभा कापून त्यावर चेरीचा पाक लावणे.
- अर्धे क्रीम, निम्म्या चेरी आणि निम्मी किसलेली कॅडबरी एका केकच्या भागावर लावणे व त्यावर दुसरा केकचा तुकडा ठेवणे.
- त्यावर उरलेले क्रीम, चेरी आणि कॅडबरी घालणे. जर क्रीम ताटलीत आले तर ते पुन्हा केकवर ओतणे.
टीप
मी केक ओव्हल आकाराचा बनवलेला त्यामुळे तो दुबत्या बोटीसारखा दिसत होता
दुध आणि अंड्याचे पांढरे एकत्र करताना एकदम हळूहळू एकत्र करणे
0 comments:
Post a Comment