खोबऱ्याचे नाडू
मी पाटीशाप्ता बनवलेले तेंव्हा त्याचे खोबऱ्याचे मिश्रण जास्त केलेले आणि मी त्याचे मोदक बनवण्याचा विचार करत होते पण अजॉयनी हे छोटे लाडू - नाडू बनवायला सांगितले.
साहित्य
१ वाटी गुळाचे तुकडे
१/२ वाटी गुळ
१/२ वाटी खोबरे
कृती
- गुळाचे तुकडे १.५ मिनिट मायक्रोवेव्ह करणे.
- कढईमध्ये तो गरम केलेला गुळ, उरलेला गुळ किसून आणि खोबरे घालणे व सारखे ढवळत शिजवणे.
- मिश्रण एकसंध गोळा बनून आल्यावर त्याचे छोटे छोटे लाडू बनवणे
टीप
हे लाडू मस्त कॅरॅमेल सारखे कुरकुरीत लागतात. नेहमीचे लाडू मऊ असतात पण मला हे असे कुरकुरीत जास्त आवडतात. ते मायक्रोवेव्ह मध्ये गुळ गरम केल्यानी असे बनतात. मला ते गॅसवर कसे बनवायचे माहित नाही त्यामुळे जर कोणाला माहिती असेल तर सांगणे.
0 comments:
Post a Comment