स्ट्रॉबेरी सॉरबे
जेंव्हा मी आईसक्रीममेकर विकत आणला तेंव्हा मला दुविधा झालेली की पहिल्यांदा आंबा आईसक्रीम बनवायचे की सॉरबे.. दोन्ही माझे खूप आवडते पदार्थ पण आंबा आईसक्रीमनी बाजी मारली. पण आज कॉस्कोमध्ये गेल्यावर मी भरपूर स्ट्रॉबेरी आणले आणि सॉरबे बनवले. गरमीच्या या दिवसात उत्तम ठरतंय ते.
साहित्य
६०० ग्राम स्ट्रॉबेरी
२ वाटी साखर
१/२ वाटी लिंबू रस
१/२ वाटी कॉर्न सिरप
कृती
- स्ट्रॉबेरी ४ तुकडे करून काचेच्या भांड्यात घालणे..
- त्यात साखर आणि लिंबू रस घालुन नीट ढवळणे
- रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून देणे.
- सकाळी उठून ह्या मिश्रणात कॉर्न सिरप घालुन मिक्सर मध्ये वाटून घेणे.
- हे मिश्रण आईसक्रीममेकरमध्ये घालुन मशीन चालू करणे.
- साधारण ३० मिनिटांनी सॉरबे तयार होईल. ते डब्यात घालुन २-३ तास फ्रीजरमध्ये ठेवून देणे. नंतर पुदिन्याच्या पान लावून खायला देणे
टीप
मी मिक्सर मध्ये मिश्रण बनवताना ते पल्स केले त्यामुळे सॉरबेमध्ये स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे तुकडे राहिले आणि चव आणखीन खुलून आली.
मिश्रण रात्रभर थंड करण्याऎवजी २-३ तास थंड केले तरी चालते.
0 comments:
Post a Comment