कुरकुरीत मुंगडाळ
मला हि डाळ आवडते आणि आज दुकानात त्याचे पाकीट बघितल्यावर घरी करून बघायचे ठरवले. एकदम सोप्पे आणि पटकन होणारा हा पदार्थ तुम्हीसुद्धा करून बघा.
साहित्य
१ वाटी मुंग डाळ
चिमुटभर खाण्याचा सोडा
मीठ
तेल
कृती
- मुंग डाळ ४-५ वाटी पाण्यात सोडा घालुन रात्रभर भिजवणे.
- सकाळी मुंग डाळ धुवून कापडावर पसरवणे.
- कढईत तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर डाळ तळणे व टिश्यूवर तेल निथळण्यासाठी ठेवणे.
- मीठ शिंपडून थंड झाल्यावर खायला देणे.
टीप
मी मुंगडाळ तळताना त्यात एक मोठी स्टीलची चाळणी ठेवून त्यात तळली त्यामुळे डाळ तेलातून बाहेर काढणे सोप्पे होते
मुंग डाळ तेलात टाकल्यावर खूप बुडबुडे आले पाहिजेत. हळू हळू ते कमी होऊन एकदम नाहीशे झाले की डाळ तयार असेल.
0 comments:
Post a Comment