Dec 2007
06
पालक मेथी वडा
आई बाबा काल आल्यावर त्यांच्यासाठी काहीतरी नवीन बनवण्याची मला फार इच्छा होती.. आणि घरात खूप साऱ्या पालेभाज्या पण होत्या मग मी हा पदार्थ बनवला.

साहित्य
२ वाटी पालक
१ वाटी मेथी
१/२ वाटी कोथिंबीर
३ वाटी बेसन
३ चमचे तांदुळाचे पीठ
१ हिरवी मिरची
१ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
मीठ
तेल
कृती
- सगळ्या पालेभाज्या बारीक चिरून घेणे.
- त्यात बारीक चिरून हिरवी मिरची, बेसन, तिखट, तांदुळाचे पीठ, जिरे पूड, धने पूड, मीठ घालुन एकत्र करणे.
- थोडे पाणी घालुन घट्ट पीठ भिजवावे
- कढईत तेल गरम करून त्यातले २ चमचे गरम तेल वड्याच्या मिश्रणात घालणे.
- छोटे छोटे वाडे बनवून ते गरम गरम तेलात मध्यम आचेवर तळून घेणे.
टीप
मीठ घालुन भाज्या थोड्यावेळ बाजूला ठेवावे म्हणजे त्याला सुटलेले पाणी पीठ भिजवायला वापरता येते आणि नंतर पीठ पातळ होण्याची शक्यता राहत नाही.
वडे गोलाकाराऎवजी थोडे पातळ करावे म्हणजे एकदम कुरकुरीत होतील.
0 comments:
Post a Comment