कोळंबी बरिटो बोल
चिपोटले हि अजॉयची आवडती फूडचेन आणि बऱ्याच वेळा तिथे जाण्यासाठी मागे लागतो. आम्ही तिथे नेहमी चिकन बरिटो बोल खातो. आज मी स्वतः घरी बनवण्याचे ठरवले पण माझ्याकडे बोनलेस चिकन नसल्यानी मी कोळंबी वापरली. फार छान झालेले
साहित्य
४०० ग्राम कोळंबी
१.५ वाटी तांदूळ
५ टोमाटो
१ लिंबू
३ वाटी स्वीटकॉर्न
३ चमचे दही
३ चमचे तिखट
१/२ चमचा ओरिगानो
१/२ चमचा मिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/२ वाटी किसलेले चीज
१/४ वाटी रेंच ड्रेसिंग
१/२ वाटी कोथिंबीर
४ चमचे लोणी
लेट्युस
मीठ
ओलिव्ह तेल
कृती
- दह्यात एक चमचा तिखट, धने पूड, गरम मसाला घालुन एकत्र करणे. त्यात कोळंबी घालुन एकत्र करणे व बाजूला ठेवणे.
- कुकरमध्ये तांदुळात २.५ वाटी पाणी घालुन भात बनवणे.
- कढईत १/४ चमचा तेल घालुन त्यात कोथिंबीर थोडी शिजवून घेणे व भातात घालणे.
- भातात लिंबाचा रस आणि मीठ घालुन एकत्र करणे व बाजूला ठेवणे
- कढईत चमचाभर तेल घालुन त्यात टोमाटो वाटून घालणे. त्यात २ चमचा तिखट, मिरे पूड, ओरिगानो आणि मीठ घालुन चांगले शिजवणे. मिश्रण सुकले की बाजूला ठेवून देणे.
- कढईत लोणी गरम करणे व त्यात कोळंबी मिश्रण सुकेपर्यंत भाजून घेणे
- ३ मोठ्या भांड्यात बरिटो बनवण्यासाठी भाताचा थर देणे.
- त्यावर कोळंबी, बर्रिक चिरलेले उरलेले २ टोमाटो आणि चीज घालणे.
- स्वीटकॉर्न ३ मिनिट मायक्रोवेव्ह करून बोलमध्ये घालणे.
- त्यावर टोमाटोचा तिखट सॉस, रेंच ड्रेसिंग आणि लेट्युस घालणे
टीप
मी कॉर्नला लवकर शिजवण्यासाठी मायक्रोवेव्ह केले. पण त्याऎवजी पाणी घालुन उकलावता पण येईल.
टोमाटोचा तिखट सॉस जास्त तिखट बनतो. मी अजून एक चमचा तिखट वापरलेले पण खूप मला ते जरा जास्तच तिखट वाटले.
जर घरी सार क्रीम असेल तर ते रेंच ड्रेसिंगच्याऎवजी वापरता येईल, माझ्याकडे नव्हते म्हणून मी ड्रेसिंग वापरले.
माझ्याकडची कोळंबी फार मोठी होती म्हणून तळल्यावर मी प्रत्येकाचे २-३ तुकडे केले.